जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात यंदा जळगाव आणि भुसावळ शहरांना चांगले मानांकन मिळाल्याचे दिसून येत आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
या संदर्भातील वृत्त असे की, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण-२०२२च्या नामांकनाची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यात देशभरातील शहरांमधून सर्वेक्षण करून यातील स्वच्छतेच्या विषयाबाबत रँकींग देण्यात आलेली आहे.
यंदाच्या यादीत १ ते १० लाख लोकसंख्या असणार्या शहरांमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत जळगाव शहर हे ८४ व्या स्थानावर असून भुसावळ शहराला ९८ इतकी रँकींग मिळालेली आहे. यंदा सर्वेक्षणात एकूण ३८२ शहरांना स्थान प्रदान करण्यात आले आहे.
जळगाव महापालिकेला यंदा ४२८६.८३ इतके गुण मिळाले आहेत. तर भुसावळ नगरपालिकेला ४१४४.७५ इतके गुण प्रदान करण्यात आलेले आहेत. यामुळे यंदा स्वच्छ सर्वेक्षणात या दोन शहरांनी बाजी मारलेली आहे. जळगाव महापालिकेत महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या प्रयत्नांना कौतुकाची थाप मिळाली आहे. तर भुसावळ नगरपालिकेवर सध्या रामसिंग सुलाणे हे प्रशासक असून मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्या कामालाही स्वच्छ सर्व्हक्षणाच्या रँकींग मधून कौतुकाची थाप मिळाल्याचे दिसून येत आहे.