जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील एकता पतसंस्थेतर्फे 27 रोजी नोट मेला आयोजित करण्यात आला होता. नोट मेलामध्ये 20 रूपयांच्या कोऱ्या नोटांचे वितरण करण्यात आले.
नवीपेठेतील एकता पतसंस्थेच्या एकता हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाशचंद समदडीया हे होते तर व्यासपिठावर पतसंस्थेचे अध्यक्ष ललित बरडीया, उपाध्यक्ष घनश्यामदास अडवाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता कोलते, अनिल सोगाठी, सुभाष कासट, दयानंद कटारिया, सुरेश पाटील, नामदेव वंजारी, सुभाष जाखेटे आदी उपस्थित होते.
एकता पतसंस्थेतर्फे नेहमी नोट मेला आणि चिल्लर मेलाचे आयोजन करण्यात येत असते. शुक्रवारी दुपारी 11 वाजता जळगावकर नागरिकांना प्रत्येकी 20 रूपयांचे एक बंडल म्हणजे 2 हजार रूपयांचे वितरण करण्यात आले. नोट मेळ्यात 10 लाख रुपयांच्या कोर्या नोटांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे प्रवीण कोतकर, राधिका देसाई, हर्षा कुलकर्णी, किरण माहेश्वरी, हर्षाली देवरे, प्राजक्ता अवचार, कल्पना पाटील, नितीन पाटील, किसन कदम, सुभाष साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.