जळगाव प्रतिनिधी । शहर पोलीस ठाणे तसेच शनिपेठ पोलीस ठाण्यांतर्फे मंगळवारी सकाळी गावठी दारुच्या अड्ड्यावर छापे टाकण्यात आले. यात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोघा कारवाईत एकूण 1600 रुपये किमतीची गावठी दारु जप्त करण्यात आली आहे.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरुण निकम यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील वासुदेव सोनवणे, विजय निकुंभ, बशीर तडवी, सचिन वाघ, गणेश शिरसाठे, भास्कर ठाकरे, वैशाली पावरा, रतन गीते, दिलीप पाटील यांच्या पथकाला सुचना केल्या. त्यानुसार पथकाने गेंदालाल मिल गाठले. याठिकाणी घराच्या भिंतीच्या आडोश्याला गावठी दारु विक्री करणार्या वंदना अहिरे या महिलेस ताब्यात घेतले. तिच्याकडून 800 रुपये किमतीची गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिपेठ पोलिसांची मेक्सोमाता नगरात कारवाई
शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांच्या गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील दिनेशसिंग पाटील, हकीम शेख, किरण वानखेडे, रविंद्र पवार, संजय शेलार, अमोल विसपुते यांना सुचना केल्या. पथकाने मंगळवारी सकाळी मेक्सोमाता नगर गाठले. याठिकाणी गावठी दारु विक्री करणार्या शांताराम पुंडलिक महाले वय 50 यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून 800 रुपयांची 15 लीटर गावठी दारु हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.