फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । तापी-पूर्णा संगमावरील पवित्र जल आणि संत मुक्ताई मंदिरातील माती ही अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या भूमिपुजनासाठी जनार्दन हरीजी महाराज घेऊन जात आहेत. आज त्यांनी विधीवत पूजा करून जल व माती आणल्यानंतर संत व महंतांच्या उपस्थितीत याचे पूजन करण्यात आले.
तापी पूर्ण संगमावरील पवित्र जल व मुक्ताई समाधी स्थळावरील मातीचे खंडोबा देवस्थानात आयोजित कार्यक्रमात पूजन करण्यात आले. याप्रसंगी सर्व संत महंत तसेच श्रीरामांना आराध्य मांनणार्या सर्व समाजाच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर प्रथम श्रीराम पूजन करण्यात आले. नंतर जल व मातीचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, स्वामीनारायण गुरुकुलचे शास्त्री भक्ती प्रकाश दास, शास्त्री भक्ती किशोर दास ,वृंदावन धाम पालचे गोपाल चैतन्य महाराज, कन्हैया महाराज, इस्कॉन मंदिरातील नरेंद्र परदेशी ,सुरेश शास्त्री, मानेकर बाबा, राम मनोहर शास्त्री, प्रवीण महाराज, दुर्गादास महाराज चिनावल, धनराज महाराज अंजाळेकर आदी संत मंडळी उपस्थित होती. यासोबत खासदार रक्षाताई खडसे, आमदार राजूमामा भोळे, आ शिरीष चौधरी, आमदार आमदार संजय सावकारे. माजी जि. प. उपाध्यक्ष नंदू महाजन आदी लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती होती.
खालील व्हिडीओत पहा पवित्र जल व माती पूजनाची क्षणचित्रे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/612695206099864