अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जैतपिर ता. अमळनेर येथील शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकेश राजपूत यांच्या उपस्थिती त विद्यार्थी यांना गणवेश वाटप करण्यात आले.
शासनाच्या गणवेश निधीसाठी जिल्हा परिषद यांच्याकडून निधी मागवून इयत्ता पहिली ते सातवी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुकेश राजपूत तसेच लोकनियुक्त सरपंचा श्रीमती संगीता महेंद्र पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य व वि का सोसायटी चेअरमन , सदस्य , पालक वर्ग आणि गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. गणवेश मिळाल्यानंतर सर्व विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले व मुले शाळेत यायला उत्साहीत झाले. त्याचबरोबर मुख्याध्यापक व शिक्षक , शिक्षिका यांनी सहकार्य केले.