जळगाव (प्रतिनिधी) जैन महिला मंडळ जळगावतर्फे एक्युप्रेशर सुजोग व वाईब्रेशन चिकीत्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
१७ सप्टेंबरपासून व. वा वाचनालयाजवळील सखी हॉल येथे सकाळी ८ ते १२.३० सांय ४ ते ७ या डॉ राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थेचे डॉक्टर तपासणी करणार आहे. ब्लडप्रेशर, सायाटीका, कमरेचे दुखणे, हात पाय सुन्न होणे, मधुमेह, सांध्याचे दुखणे, थॉयराईड, जूनी डोके दुखी, दमा, लठठपणा, लकवा, झोप न येणे, गॅस कब्ज, गुडघेदुखी, पाठदुखी इ आजारांची तपासणी करण्यात येणार असून नाम मात्र १५० रुपये तपासणी व उपचार फि घेण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी आशा पगारीया ९४२३१८७२०१ललीता श्रीश्रीमाळ ९४२३४ ९०१८१ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.