अमळनेर (प्रतिनिधी) जलसंपदा मंत्री जिल्ह्यातील असूनही ना. महाजन यांनी २३०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन पाळले नाही तर भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आ.सौ.स्मिता वाघ यांची भाजप सरकारमधील पत संपली आहे ! असा घणाघाती आरोप सुभाष चौधरी यांनी यावेळी केला. शासनाने धरणासाठी भरघोस निधी द्यावा या मागणीसाठी शनिवारी (२ मार्च) दु.१२.०० वाजता जनआंदोलन समितीतर्फे जेलभरो आंदोलन येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान आंदोलनाचा आजचा दिवस अहिराणी घोषणांनी गाजला.
पाडळसे धरणासाठी १० दिवसांपासून जनआंदोलन सुरू असूनही शासनाने यंदाच्या बजेट मध्ये तुटपुंजी तरतूद पाडळसे धरणासाठी केल्याने आम्ही खचून न जाता आंदोलन तीव्र करून जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असे शिवाजीराव पाटील यांनी आज जाहीर केले. राष्ट्रवादी काँगेसतर्फे सचिन पाटिल यांनी १ मार्चला आश्वासन न पाळणाऱ्या जलसंपदा मंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येईल असे जाहीर केले. रांगोळीकार नितीन भदाणे यांनी धरणासाठी वेळ पडल्यास देहत्याग करेल, असे म्हटले. भाजप पाडळसे धरणाला न्याय देणार नाही, हे आता जनतेला माहिती झाले असल्याचे मा.उपसभापती धनगर दला पाटील व प्रा.सुभाष पाटील यांनी सांगितले. गावरान जागल्या मंच विश्वास पाटील यांनी “केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी” असल्याची टीका केली. प्रा.शिवाजीराव गांधलीकर, हिरालाल पाटील यांनी बहुजन क्रांती मोर्चा, किसान मोर्चाही २ मार्चला जेलभरो आंदोलनात सहभागी होईल, असे जाहीर केले. सानेगुरुजी स्मारक कर्मभूमीच्या कार्यकर्त्या दर्शना पवार यांनीही आंदोलनास संबोधित केले.
आज समस्त लाडशाखीय वाणी समाज पंच मंडळाने आंदोलनास पाठिंबा देत उपोषनात सहभाग नोंदविला.अध्यक्ष प्रकाश अमृतकार,उपाध्यक्षा सौ.अरुणा अलई , प्रा.दत्तात्रय भामरे, सुनिल भामरे,सौ.अर्चना तलवारे,गजानन धांडे,नारायण खोडके,भिका वाणी,दिनकर नागदकार, दिपक तलवारे,चंद्रकांत येवले, गिरीश शिरोडे,अनिल वाणी,सोमनाथ नेरकर,चंद्रकांत पुरकर,गजानन कोतकर, आदिंसह समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिर सुवर्णकार युनियनतर्फे उपाध्यक्ष राजेंद्र पोतदार, अध्यक्ष जितेंद्र भामरे, सचिव निलेश देवपूरकर आदिंनी उपस्थिती देत पाठींबा पत्रक दिले. दी.सोनार अँड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष मदन सराफ, सचिव संजय विसपुते यांनी पाठिंबा दिला.राजपूत एकता मंचतर्फे अनिल पाटील, विजयसिंग राजपूत, चंदुसिंग परदेशी, रणजित पाटील, गुलाबसिंग पाटील, नरेंद्रसिंग ठाकोर, चेतन राजपूत, राजेंद्र सिंह परदेशी, दिलीपसिंग भोरटेके, मुकेश राजपूत, महेंद्र पाटील आदिंसह अनेकांनी उपस्थिती दिली. इस्टेट ब्रोकर संघटनेचे सुभाष पाटील, अरुण पाटील,ज्ञानेश्वर पाटील,राजेश पाटील, अशोक मोरे, आबा फुलपगारे, लोटन पाटील, हेमंत कोळी, सुरेश ठाकूर, किरण सावंत, जितू जोशी, प्रकाश बडगुजर, विष्णू जाधव, असगर अली बोहरी, बाळासाहेब महाजन आदिंसह सदस्य मोठया संख्येने सदस्य आंदोलनात उपस्थित होते.पातोंडाचे ग्रामस्थ जगदीश पवार,संजय पवार, मुकुंद पवार, विशाल पाटील, भरत बाविस्कर आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पाठींबा देत सहभाग दिला.जुनोने ग्रामपंचायतचे रामलाल पाटील, प्रकाश पाटील, लहू पाटील, दिनेश पाटील, रामकृष्ण धनगर, सौ.मनिषा पाटील, भिमसिंग पाटील हे सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सचिन पाटील, मुख्तार खाटीक, अनिल शिसोदे, प्रा.सुरेश पाटील, भागवत पाटील, सुनिल शिंपी, भिकन मालपुरे, विकास पाटील, उमेश सोनार, बापू कोळी हे कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.
रंजाने येथील बचत गटांच्या महिला कार्यकर्त्या सपना पाटील, सुवर्णा पाटील, भारती पाटील, भाग्यश्री पाटील, कोकीलाबाई ठाकूर, सुनीता पाटील,कमल शिंपी, कल्पना पाटील, प्रतिभा पाटील, मनीषा पाटील, अरुणा पाटील, मंगल पाटील,अनिता पाटील, सुमन पाटील, टोंगल पाटील, वंदना पाटील, सुशिला पाटील, रजूबाई धोबी आदि महिला उपस्थित होत्या तर बहुजन मुक्ती पार्टीचे संदिप सैंदाणे,बांधकाम व्यावसायिक ओमप्रकाश मुंदडा, प्रा.अशोक पवार, समितीचे एस.एन.पाटील, रामराव पवार, अजयसिंग पाटिल, रणजित शिंदे, डी.एम.पाटील, रवी पाटील, सुनील पाटील, प्रशांत भदाणे, देविदास देसले, सुनील पवार, एन.के.पाटील, योगेश पाटील, डॉ.देविदास पाटील(चोपडा), सुहास एलमामे, नगरसेवक शेखा हाजी आदिंसह विविध संघटनांच्या प्रतिनिधीनी आंदोलनात दिवसभर सहभाग नोंदविला.
अहिराणी म्हणींचा तडका –
यावेळी आंदोलकांनी ‘जलसंपदा मंत्री तुमना जिल्हाना, आमना काय कामना!’
‘७/७ आमदार तुमना भागना, आमना काय कामना!’
‘२-२ आमदार अम्मयनेरना, आमना काय कामना!’ अशा अहिराणी घोषणा दिल्या.