फैजपूर प्रतिनिधी । सालाबादप्रमाणे यंदा ही जय गजानन ग्रुप फैजपूरतर्फे ‘शेगाव पदयात्रा’चे आयोजन दि.30 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जय गजानन ग्रुप फैजपूरतर्फे ‘शेगाव पदयात्रा’दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजता येथून निघणार आहे. मुक्ताईनगर, मलकापूर आंबोडा मार्गे दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव येथे पोहचणार आहे. यावेळी पालखीचे देखील आयोजन असणार आहे. यासाठी भाविकांनी आपले प्रवेश अर्ज वारीप्रमुख दिपक होले, दिनकर नारखेडे, योगेश नारखेडे, गिरीश नेमाडे यांचेकडे त्वरित भरून द्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.