जळगाव प्रतिनिधी । विद्यूत खंबावर काम करत असतांना तोल गेल्याने 45 वर्षीय कंत्राटी झिरो वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना भडगाव तालुक्यातील गिरड येथे 15 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, जहांगीर लालख तडवी (वय-45) रा.पिंप्राळा जळगाव येथे गेल्या 20 वर्षांपासून महावितरण विभागात कंत्राटी वायरमन म्हणून कामाला आहे. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता भडगाव तालुक्यातील गिरड येथे कामानिमित्त गेले होते. दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास विद्यूत खंब्यावर काम करत होते. त्यात पाऊस सुरू होता. यावेळी त्यांचा पाय सरकल्याने तोल जावून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सहकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैदयकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.