जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | 3 जानेवारी निमित्त गोजराई फाउंडेशन तर्फे जगवाणी नगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी ‘साऊ पेटती मशाल’ या गीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
तसेच महेश मोरे या शालेय विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुलेंच्या जीवनाबद्दल माहिती दीली आणि मनस्वी गायकवाड या चीमुकलीने सावित्रीमाई फुलेंची वेशभूषा साकारली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोजराई फाउंडेशनचे उपाध्यक्ष विद्या गायकवाड उपस्थित होते.त्याच सोबत सौ.मनीषा दीपक तांबट, विद्या तुषार सोनवणे, ललिता अनिल पाटील, कल्पना संदीप सुरळकर, रेखा सुभाष आमोदकर,कीनु जितेंद्र आमोदकर, शालिनी नंदकिशोर पाटील,वैशाली दिलीप गायकवाड,नेहा मनोज गायकवाड,निर्मला दिलीप पाटील,लक्ष्मीबाई दामोदर गैहलोत उपस्थित होते.