जळगाव प्रतिनिधी । मेहुण्याच्या जागेवर गेल्या चार वर्षांपासून राहत असलेल्या शालकाने जागेव्या वादातून मेहुण्यावर कुऱ्हाडीने वार करत जखमी केल्याची घटना कुऱ्हाळदे येथे रात्री 10 वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीसात शालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, रामचंद्र पिराजी पाटील (वय-60) रा. कुऱ्हाळदे यांनी चारवर्षांपुर्वी शालक सुपडू दिनकर पाटील यांना गोठ्याची जागा राहण्यासाठी दिली होती. गोठ्याच्या बाजूला गाय व म्हैस बांधले जातात. रविवारी रात्री 10 वाजता म्हैस बांधण्याच्या वादातून ही जागा माझी आहे असे सांगत शालक सूपडूने मेहुणा रामचंद्र पाटील यांना शिवीगाळ करून कुऱ्हाडीने वार केले. यात रामचंद्र यांच्या डोक्याला, मानेला व उजव्या हाताला गंभी दुखपत झाली. याबाबत रामचंद्र पाटील यांचा मुलगा अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून सूपडू पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि ससाणे करीत आहे.