मुंबई वृत्तसंस्था । जगातील अजब गजब किस्से किंवा घटनाबाबत तुम्ही ऐकलं असेलच. तसेच सोन्याच्या कॉईनबाबतही ऐकलं असेल. कदाचित तुम्ही गुंतवणूक म्हणून सोन्याचं नाणं विकतही घेतलं असेल. पण कधी तुम्ही सोन्याचं जगातलं सर्वात मोठं नाणं पाहिलंय का?
जगातलं हे सोन्याचं सर्वात मोठं नाणं हे एक टन सोन्यापासून तयार करण्यात आलं असून हे नाणं पर्थ मिंटने तयार केलं आहे. हे सोन्याचं नाणं न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये मंगळवारी पर्थ मिंट फिजिकल गोल्ड इटीएफच्या लॉन्चिंगवेळी सादर करण्यात आलं. यासाठी वापरण्यात आलेल्या सोन्याची शुद्धता ९९.९ टक्के इतकी आहे. या नाण्याची रुंदी ८० सेंटीमीटर आणि जाडी १२ सेंटीमीटर आहे. या सोन्याच्या नाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये समावेशही करण्यात आला आहे.