जळगाव प्रतिनिधी । जबरीची घरफोडी आणि चोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी मध्यरात्री अटक केली. याप्रकरणी तिघांविरोधात आर्म ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जबरीची चोरीच्या प्रयत्नात असतांना एकाला दुखापत केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भाग 5, गुरनं 33/2020 भादंवि 394,34 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर परीसरात असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षण रणजित शिरसाठ यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पो.कॉ. किशोर पाटील, पो.कॉ. सचिन पाटील यांनी बुधवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी मायकल उर्फ उमेश कनैय्या नेतलेकर (वय-21), अविनाश किशोर जोशी (वय-21) आणि गणेश अरूण जोरी (वय-31) तिनही रा. संजय गांधी नगर, सिंधी कॉलनी यांना मोटारसायकलसह अटक केली असून मायकल कडून 16 इंच लांबीचा सुरा हस्तगत केला आहे. पो.कॉ. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात एमआयडीसी पोलीसात मुंबई पोलीस कायदा 122 (क) आणि ऑर्म ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील करीत आहे.