जे. टी. महाजन इंग्लिश मिडियम स्कूलचा १००% निकाल

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जे. टी. महाजन इंग्लिश मिडियम स्कूलच्या इ. १० वी च्या विद्यार्थ्यांनी १००% निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे.

विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विद्यालयाची परंपरा कायम ठेवत विद्यार्थीनी सोनम युवराज बोरोले हिने ९८.०० % गुण घेत प्रथम क्रमांकावर बाजी मारली. तर ९७.०० % गुण मिळवत गोपाळ नंदकिशोर अग्रवाल याने द्वितीय स्थान पटकावले तर विद्यार्थीनी फाल्गुनी धनराज बोरनारे हिने ९६.८० % गुण घेत तिसरा. व खुशबू रवींद्र पाटील हिने ९६.४० गुण घेत चौथा क्रमांक मिळविला. तसेच केतन विनोद बोरवले याने ९५.६० गुण मिळवून पाचवा तर योगिता धनराज भंगाळे तिने ९५% गुण प्राप्त करत शाळेतून सहावा क्रमांक मिळवला.

विद्यालयातील दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या एकूण ५५ विद्यार्थ्यांपैकी ३१ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण पटकावले. १८ विद्यार्थ्यांनी ८५% पेक्षा अधिक गुण मिळवले. ५ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा तर उर्वरित १ विद्यार्थी ८०% पेक्षा कमी गुण घेत उत्तीर्ण झाला.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद जिवराम महाजन; संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी, उपाध्यक्ष मार्तंड गणपत भिरूड, सेक्रेटरी, विजय रघुनाथ झोपे, जॉ. सेक्रेटरी सोनू गोमा भंगाळे, सर्व संचालक प्रतिनिधी इतर सदस्य व पदाधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री. मोझेस जाधव, प्राचार्य, नंदकिशोर सोनवणे, पर्यवेक्षिका सौ. पुनम नेहेते आणि विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Protected Content