जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरातून तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, अरबाज शहा नादर शहा (वय-२०) रा. दूध डेअरी गल्ली, मास्टर कॉलनी जळगाव हा तरुण मिस्तरीचे काम करून उदरनिर्वाह करतो. कामासाठी त्याच्याकडे (एमएच १९ डीडी ५९१६) क्रमांकाची दुचाकी आहे. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील मेहरून तलाव परिसरात असलेल्या जे.के. पार्क समोर अरबाजने दुचाकी पार्किंग करून लावली. त्यानंतर अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किमतीचे दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी अरबाज शहा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक मिलिंद सोनवणे करीत आहे.