Home प्रशासन मंत्रालय शाहा व नड्डांच्या भेटीनंतरच ठरला नाथाभाऊंच्या ‘घरवापसी’चा मुहुर्त !

शाहा व नड्डांच्या भेटीनंतरच ठरला नाथाभाऊंच्या ‘घरवापसी’चा मुहुर्त !


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर आमदार एकनाथराव खडसे यांची भाजपमधील ‘घरवापसी’ निश्‍चीत झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

आमदार एकनाथराव खडसे हे भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू असतांना आज वेगवान घडामोडी झाल्या. खडसे हे काल रात्रीच दिल्लीस जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. यानंतरच त्यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्‍चीत झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आमदार एकनाथराव खडसे यांच्या शाहा तसेच नड्डा यांच्या भेटीचा फोटो देखील समोर आला असून तो सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे. तर, नाथाभाऊंचा नेमका प्रवेश केव्हा होणार ? याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहचल्याचे दिसून येत आहे.


Protected Content

Play sound