जळगाव प्रतिनिधी । आयकर खात्याच्या पथकांनी शहरातील आठ रूग्णालयांची सुरू केलेली तपासणी रात्री उशीरापर्यंत सुरूच होती, आजदेखील ही तपासणी सुरू राहणार असल्याचे वृत्त आहे.
आयकर विभागाच्या नाशिक, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील पथकांनी बुधवारी जळगाव शहरातील आठ रूग्णालयांवर सशस्त्र पोलिस बंदोबस्तात धाडी टाकून तपासणी केली. गुरूवारी रात्री उशीरापर्यंत ही तपासणी सुरूच होती. दरम्यान, ही कारवाई अतिशय गोपनीय पध्दतीत केली जात आहे. याचा कोणत्याही प्रकारचा तपशीर प्रसारमाध्यमांना देण्यात आलेला नाही. शुक्रवारी दिवसादेखील ही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे. शहरात इतक्या दीर्घ काळापर्यंत कधीही आयकर खात्याचे पथक तळ ठोकून नसल्यामुळे या धाडींमध्ये नेमके काय आढळले ? याबाबत आता तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.