जळगाव प्रतिनिधी । शहरातील सात हॉस्पीटल्सच्या संचालकांच्या घरांवर आज आयकर खात्याच्या पथकाने धाडी टाकल्याचे वृत्त आहे.
याबाबात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, शहरातील सात विख्यात हॉस्पीटल्स आणि त्यांच्या संचालकांच्या निवासस्थानी आज दुपारी आयकर खात्याच्या पथकाने अचानक धाडी टाकून तपासणीस प्रारंभ केला असून यामुळे खळबळ उडालेली आहे. याबाबत आयकर खात्याशी संपर्क केला असता त्यांनी विवरण देण्यास नकार दिला. यातील एक डॉक्टर हे काँग्रेसशी तर दुसरे भाजपशी संबंधीत असल्याचे समजते. यानंतर इतर काही हॉस्पीटल्समध्येही याच प्रकारची कारवाई सुरू असल्याचे वृत्त आहे.
( सविस्तर वृत्त लवकरच )
कृपया बातमी मध्ये त्यांची नावे सुद्धा टाकावी