जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व कुरीअर कंपनी व वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या कुरिअर एजन्सी यांनी न्यायालयाच्या आदेशान्वये कॅरेज बाय रोड ॲक्ट 2007 अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच विना नोंदणीकृत माल वाहतूक करणाऱ्या कुरीअर कंपन्या व वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या एजन्सींविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कुरिअर कंपन्या व वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या कुरीअर एजन्सी यांनी तात्काळ शासकीय शुल्काचा भरणा करून कंपन्या नोंदणीकृत करून घेऊन तसे प्रमाणपत्र करुन घ्यावेत. अन्यथा अशा कंपन्या व एजन्सीविरुध्द मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.