Home राष्ट्रीय इस्रायल भारताला दहशतवादाविरुद्ध अमर्याद मदत देणार

इस्रायल भारताला दहशतवादाविरुद्ध अमर्याद मदत देणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पुलवामा हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली जात आहे. त्यानंतर भारतानेही पाकिस्तानविरोधात कूटनीतीचा अवलंब केला आहे. भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने भारताला खुले समर्थन दिले आहे. लढाईत आम्ही कोणतीही मर्यादा पाळणार नाही. भारताला या लढ्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे.

भारताला मदतीसाठी कोणतीही अट ठेवणार नाही. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताला विनाअट लागेल तशी मदत करण्याची ग्वाही इस्रायलनं दिली आहे. आम्ही तुम्हाला मदत करताना कोणतीही मर्यादा पाळणार नाही. विशेष म्हणजे दहशतवादी हल्ल्यांविरोधातील लढ्यासाठी इस्रायल पद्धतीचा वापर करण्याची मागणी जोर धरत असताना इस्रायलने दिलेल्या पाठिंब्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.  इस्रायलचे भारतातील राजदूत डॉ. रॉन माल्का यांनी ही माहिती दिली आहे. दहशतवादाची समस्या झेलत असलेल्या भारताला इस्रायल काय मदत करणार ? असा प्रश्न डॉ. माल्का यांना विचारला असता त्यांनी भारताला अमर्याद मदत करायला तयार असल्याचे  सांगितले. आम्ही भारतासारख्या आमच्या सच्च्या आणि जवळच्या मित्राला कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी सज्ज आहोत. दहशतवाद ही भारत आणि इस्रायलपुरती मर्यादित समस्या नसून जगभरात तिचा उपद्रव आहे. त्यामुळेच दहशतवादाविरोधात आम्ही आमच्या सच्च्या मित्राला इस्रायली युद्धतंत्र देऊ, असेही डॉ. माल्का म्हणाले. इस्रायलचे अध्यक्ष नेतान्याहू यांनी भारताला हरतऱ्हेचे सहकार्य करण्याची सूचना केल्याचा उल्लेखही डॉ. माल्का यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound