Home Cities अमळनेर ईश्वर महाजन उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांने सन्मानित

ईश्वर महाजन उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांने सन्मानित


अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील देवगाव देवळी हायस्कूलचे माध्यमिक शिक्षक तथा पत्रकार ईश्वर महाजन यांना नुकताच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी ‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला.

12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव येथील एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते श्री.महाजन यांना सन्मानित करण्यात आले. तसेच युवक मित्र परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘युवक मित्र पत्रकारिता पुरस्कार 2019’ देऊन अमळनेर येथे सानेगुरुजी वाचनालयातही सन्मानित करण्यात आले. ईश्वर महाजन यांचा पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी अमळनेर तालुका क्रीडा समिती एस.पी.वाघ,डी.डी राजपुत,एन.डी.विसपुते यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound