जळगाव ( प्रतिनिधी) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सी.बी.एस.ई. ) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सेंट जोसेफ सी.बी.एस.ई. स्कूलची विद्यार्थिनी कु.ईशा अशोक वाघुळदे हिने ९६ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्य संपादन केले आहे .
ईशा हिला संगीत , जलतरण आणि स्केटिंग खेळातही विशेष रुची आहे . शालेय जीवनात तिने विविध स्पर्धेत अनेक पारितोषिके पटकावली आहेत. ” मला आर्किटेक्ट व्हायचे आहे ” अशी मनिषा तिने यावेळी बोलून दाखविली.ईशा ही एमआयडीसीमध्ये असलेल्या प्रसिद्ध अँकमे-सुजन केमिकल्स येथील मुख्य व्यवस्थापक अशोक वाघुळदे यांची कन्या तर जेष्ठ पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते व निवेदक तुषार वाघुळदे यांची पुतणी आहे . ईशाच्या या यशाबद्दल सेवानिवृत्त रेल्वे स्टेशन अधीक्षक रुपचंद नामदेव वाघुळदे , उल्हास पाटील , आमदार हरिभाऊ जावळे , माजी आमदार शिरीषदादा चौधरी , खासदार रक्षाताई खडसे ,प्रा.राजेश वाघुळदे , श्रीधरबापू चौधरी , डॉ. संजय चौधरी , डॉ . राजेंद्र पाटील यांच्यासह अनेकांनी खास अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.