भुसावळ (प्रतिनिधी) येथील तुकाराम नगरमध्ये घराबाहेर बसलेल्या परिवाराला कुठलेही कारण नसतांना दोघांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची ८ मे रोजी घटना घडली आहे. या संदर्भात बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून एका अटक करण्यात आली आहे.
पुष्पा शंकर गोसावी (रा. तुकाराम नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ८ मे रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास ते आपल्या परिवारासह घराबाहेर बसले होते. त्याचवेळी दोन अज्ञात इसम मोटरसायकल वरती आले. त्यानंतर गोसावी यांच्या घराशेजारील राहणारे नाना शंकर माळी व त्याची आई लिलाबाई शंकर माळी या दोघांना भेटले. सदरील लोकांनी आमच्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगितले. त्यानंतर आई सोबत बसलेल्या वैभव निवृत्ती पाटील ,निलिमा निवृत्ती पाटील, अनुजा वैभव पाटील व मुलगी संगीता गोसावी अशांना त्या दोघांनी लोखंडी रॉड, लाकडी काठ्यांनी मारहाण सुरु केली. सुरू असलेले भांडण आवराआवर करणाऱ्या पंकज नेमाडे यालाही मारहाण केली. नातू प्रणय अशोक गोसावी याला डोक्याच्या डाव्या साईडला मोठी दुखापत करत रक्तभंबाळ केले. तसेच डाव्या हातावर व अंगठयावर मारहाण नाना माळी, लिलाबाई माळी यांना मारहाण झाली आहे. या संदर्भात अनोळखी दोन लोकांविरुद्ध विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग – ५ कलम ३२६,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना माळी याला अटक करण्यात आली असून प्रणय याला डोक्याला सात टाके पडलेले असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे. तपास पोहेकॉ जयराम खोडपे करीत आहे.