अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नवीन सरकारच्या शपथविधीला ऐतिहासिक गंध आला आहे, कारण यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, आणि देशभरातील प्रमुख संत महंत एकत्र येणार आहेत. या शपथविधीसाठी अमळनेरच्या प्रतिपंढरपूर येथील संत सखाराम महाराज यांचे ११वे गादी पुरुष, ह.भ.प. प्रसाद महाराज यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
५ डिसेंबर, २०२४ हा दिवस मुंबईतील भव्य समारंभ होणार आहे, जिथे एकाच ठिकाणी राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील दिग्गज एकत्र येतील. तीन प्रमुख व्यासपीठे तयार केली जात आहेत, आणि ती सर्व एकत्र येणाऱ्या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार ठरतील .