यावल प्रतिनिधी । किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तालुक्यातील उंटावद येथे कोरोना रूग्ण शोध मोहिमेत ५० जणांची तपासणी करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना रूग्ण शोध मोहिम राबाविण्यात येत आहे. तालुक्यातील उंटावद येथे किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी व प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली १३ रोजी उंटावद येथील जिल्हा परिषदच्या मराठी शाळेत ५० रूग्णांचे आर.टी.पी.सी.आर.तपासणीचे स्वँब घेण्यात आले.
शिबीर यशस्वितेसाठी वैद्यकीय अधीकारी डाँ.मनिषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक गुरूदास जगन्नांथ चौधरी, डाँ.अमोल पाटील, आरोग्य सहाय्यीका उषा पाटील, आरोग्य सेवक निलेश पाटील, दिपक तायडे, जिवन सोनवणे, विठ्ठल भिसे, परिचर सरदार कानाशा, आरोग्य सेवीका के.जी.इंगडे, भावना वारके, मंगला सोनवणे, के.आर.सुर्यवंशी, एन.एन.बारेला, एस.आर.जमरा, लँब टेक्निशियन प्रिया पाटील, फार्मासिस्ट जाफर फारूकी, वाहन चालक कुर्बान तडवी यांच्यासह आशासेवीका किरण पाटील आदींनी परिश्रम घेतले.