जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्याभरातून ३१ प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले असून प्राप्त अर्जाची छाननी सुद्धा करण्यात आली आहे. सोमवार,दि.३१ ऑगस्ट रोजी पात्र शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातून सर्वाधिक ४ तर चोपडा, यावल, रावेर, पारोळा, एरंडोल तालुक्यातून प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला आहे. चाळीसगाव,भडगाव,धरणगाव तालुक्यातून ३ अर्ज प्राप्त झाले आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील, सीईओ डॉ.बी.एन.पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, डॉएट प्राचार्य मंजूश्री क्षीरसागर आदींचा निवड समितीमध्ये समावेश आहे.
जिल्हाभरातून ३१ अर्ज प्राप्त झाले असून या अर्जामधून पात्र शिक्षकांची दि.३१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या विद्या तंत्रनिकेतन या शाळेत मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड यादी नाशिक विभागाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तालुक्यतून ३ अर्ज जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आले असल्याने जिल्हा परिषदेच्या निवड समितीची कसोटी लागणार आहे.