रावेर, प्रतीनिधी | रावेर-यावल विधासभा मतदार संघासाठी विद्यमान ना. हरीभाऊ जावळेसह आठ जणांनी भाजपाकडे इच्छुक म्हणून मुलाखत दिल्या आहे. या मुळे विधानसभेचे तिकीट कोणाला मिळते ? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
इच्छुकांची संख्या जास्त असल्याने ना. गिरीश महाजन,आ एकनाथराव खडसे यांच्या नंतर भाजपात सर्वात सिनियर असलेले ना. हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापण्याची रिक्स पक्ष घेईल की नवीन चेहरा पक्ष देईल याबाबत मतदार संघातील लोक तर्क-विर्तक लढविले जात आहे. निवडणूक लढविण्यासाठी तब्बल ८ जण येथून इच्छुक आहेत. यात ना. हरीभाऊ जावळे, उद्योजक श्रीराम पाटील,माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, डॉ कुंदन फेगडे, भरत महाजन, डॉ निलेश महाजन या मंडळीनी मुलाखती दिल्या असून पक्ष आमच्या पैकी ज्याला उमेदवारी देईल त्याचे प्रामाणिक काम करणार असल्याची प्रतिक्रिया सर्वांनी दिली आहे.
चौधरी मात्र मुलाखती पासून दूर
ना. गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिल चौधरी यांनी मुलाखत दिली नाही त्यामुळे ते जवळ-जवळ अपक्ष लढतील असे मानले जात आहे.
मतदारसंघाचे असे आहे जातीय गणित
रावेर-यावल मतदारसंघात एकूण २ लाख ९५ हजार ७३५ मतदार असून यामध्ये लेवा पाटील समाज सुमारे ६३ हजार २५१ ,मुस्लिम समाज सुमारे ४८ हजार ९५८, मराठा समाज सुमारे ४४ हजार ८६४, बुध्दिष्ट समाज सुमारे ३८ हजार ८४२, कोळी समाज सुमारे २२ हजार ५१३, तडवी समाज सुमारे १८ हजार ७५२ मतदार असून सर्व निर्णायक मतदान आगामी निवडणुकीत राहणार आहे तर इतर लहान समाजाचे ५६ हजार ५६४ मतदार आहेत.