जळगाव (प्रतिनिधी) पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, जिल्हा पोलीस प्रशासन, उच्च शिक्षण विभाग, नेहरु युवा केंद्र, एन. सी. सी., एन. एस. एस., स्काऊड गाईड, जिल्हा हौशी योगा असोसिएशन, जळगाव, जिल्हा हौशी फुटबॉल असोसिएशन, पगारीया आयुर्वेद-पंतजली मेगा स्टोअर, भारत स्वाभिमान, जी. एम. फांऊडेशन, पंतजली योग समिती, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फांऊडेशन, जळगाव, जयकिरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पाचोरा, क्रीडा भारती, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन, इंडियन रेडक्रास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास महापौर सिमाताई भोळे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एस. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्य) बी. जे. पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) बी. ए. बोटे, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, पंतजलीचे हेमंत चौधरी यांच्यासह सहभागी संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन करण्यात आले. योग दिन कार्यक्रमात शहरातील 30 पेक्षा अधिक शाळेतील सुमारे 3 हजार विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले होते. पतंजली योग समिती, जिल्हा हौशी योगा असोसिएशनचे सदस्य, नागरीक, महसुल, जिल्हा परिषद, महानगरपालिका व इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार खेळाडु श्री.अशोक माधवराव चौधरी, श्रीमती अंजली भाऊसाहेब पाटील. शिवछत्रपती पुरस्कार संघटक / कार्यकर्ता – प्रा.डॉ.नारायण शंकर खडके, श्री.गणपत संभाजी पोळ, डॉ.प्रदिप प्रभाकर तळवेलकर. एकलव्य पुरस्कार खेळाडू कु.कांचन चौधरी, योगशिक्षिका अनिता पाटील आदि उपस्थित होते. या कार्यक्रमास लागणारे विविध साहित्य अनेक सामाजिक संस्थांच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात आले होते. याबद्दल या संस्थांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयुष मंत्रालयाने तयार केलेल्या शिष्टाचारानुसार उपस्थित प्रमुख पाहुणे नागरीक, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी योगासने केली. पतंजली योग समितीचे हेमंत चौधरी, राजेंद्र महाले, समाधान बरकले यांनी योगासने करुन घेतले. उपस्थितांचे आभार जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी मानले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना विविध संस्थांच्यावतीने बिस्किटांचे वाटप करण्यात आले.