धरणगावात सट्टा पेढी सुरु करण्यावरून अंतर्गत धुसफूस ; भविष्यात मोठा वाद होण्याची शक्यता

oie 1711919cw0ojk3v

धरणगाव (प्रातिनिधी) चोपडा विभागीय पोलीस अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी पदभार स्वीकारल्या पासून रेंजमधील अवैध धंदे पूर्णपणे बंद झाले होते. धरणगावात पडलेल्या धाडीनंतर तर दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे धाबेच दणाणले आहे. परंतू धरणगावात सेशन सुरु करत काही जणांना सट्टा पेढी चालवण्याची गपचूप परवानगी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे साहेब नाही म्हणताय, असा निरोप एका गटाला दिला गेलाय. साहेब इतरांना परवानगी देताय, मग आम्हालाच का नाही?, असे म्हणत हा गट संतापात आहे. या धुसफूसमुळे भविष्यात गावात दोन नंबरचे धंदेवाल्यांमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगावात पडलेल्या अक्षय तृतीयेला पडलेल्या धाडीनंतर तर दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे धाबेच दणाणले आहे. परंतू या सर्व घडामोडीत काही पोलीस कर्मचाऱ्यांनी राजकीय लागेबांधे जोपासत काही जणांना सट्टा पेढी चालवण्याची गपचूप परवानगी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. वास्तविक बघता गावात अवैध धंदे पूर्णपणे बंद करणे गरजेचे असतांना सेशन घेत परवानगी देण्यात आलीय. तर एका गटाला साहेब नाही म्हणताय,असा निरोप दिला गेलाय. साहेब इतरांना परवानगी देताय, मग आम्हाला का नाही? म्हणत हा गट संतापात आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांची बदली झाल्यापासून पुन्हा एकदा दोन नंबरच्या धंद्यांनी तोंड वर काढले असल्याचे दिसून येत आहे.

 

 

धरणगाव शहरात देखील कित्येक महिन्यापासून अवैध धंदे बंद होते. चोपडा विभागीय पोलीस अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी पदभार स्वीकारल्यापासून तर सतत कारवाया सुरु आहेत. त्यामुळे दोन नंबरचे धंदे करणारे अनेक दिवसापासून शांत बसून होते. परंतु काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा गावात सट्टा पेढीला परवानगी दिल्याचे वृत्त आहे. यात काही जणांना परवानगी देण्यात आली. मात्र, इतर काही जणांना स्पष्ट नाही सांगण्यात आले. यामुळे संतापलेल्या गटातील एकाने साहेब इतरांना परवानगी देताय, मग आम्हाला का नाही? आम्हीपण सेशन भरायला तयार आहोत,असं म्हणत एका पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारला. दुसरीकडे यावरून अंतर्गत धूसफूस सुरु झाल्याचे देखील कळते. भविष्यात मोठा वाद टाळायचा असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ सर्व सट्टा पेढी बंद करणे गरजेचे झाले आहे.

Add Comment

Protected Content