जळगाव ( प्रतिनिधी) शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने बुधवारी शहरातील शासकीय रुग्णालयांना भेट देऊन तेथील उपचारांच्या व्यवस्थेची पाहणी केली, तसेच रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांच्या नेतृत्वात तसेच प्रमुख पदाधिकारी शाम तायड़े, नदीम काझी, जमील शेख, शफी बागवान, अरूणा पाटील, संदीप तेले, जगदिश गाढे, मनोज चौधरी, राजेश शेळके, मूजीब पटेल, मेहसिन पिंजारी, प्रल्हाद सोनवणे, कासिम उमर, कैलास पाटील, सुभाष ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्हा शासकिय रुग्णालय व शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात भेट देण्यात येऊन रूग्णांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. रुग्णालयातील रुग्णांनी त्यांच्यापुढे समस्यांचा पाढाच वाचला. या भेटीमुळे या रूग्णालयांचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.