
अमळनेर (प्रतिनिधी) सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्यासाठी पक्षी जंगलात भटकंती करताना दिसतात. पण सतत दुष्काळामुळे पाणी व धान्य नसल्याने पक्षी अन्नावाचून मारताना दिसताय. पक्ष्यांबद्दल गांभीर्य लक्षात घेऊन सुबराऊ फांडेशन या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत पक्ष्यांना धान्य मिळावे, यासाठी नागरिकांना दाणे घर बाॅक्स वाटप करण्यात आले. यामुळे पक्षांना धान्यांसाठी भटकंती करावी लागणार नाही, हा या संकल्पने मागचा हेतू आहे. त्यामुळे संस्थेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शुक्रवारी सुभराऊ फांऊंडेशन,भालेराव नगर अमळनेर यांच्यातर्फे उन्हाळ्यात पक्ष्यांना दाणे टिपण्यासाठी घराबाहेर लावण्यासाठी पक्षी दाणे घर(बॉक्स) वाटप करण्यात आले. यावेळी वाटप करताना अध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील,उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव उषा आर. पाटील आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.