खामगाव (प्रतिनिधी) येथील रोटरी क्लबच्या वतीने ‘माटी के गणेश’ उपक्रमांतर्गत श्री गणेश यांची संपूर्ण पर्यावरण पूरक अशी मूर्ती गणेश भक्तांकरीता कमी दरात ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
शहरातील बालाजी प्लॉट अग्रसेन भवन समोर खंडेलवाल यांच्या हॉलमध्ये आज 28 ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपासून गणेश भक्तांकरिता गणेश मुर्ती उपलब्ध राहणार आहेत. स्टॉलची वेळ सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत राहील. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे रोटरी क्लबच्या वतीने कळविण्यात आले आहे.