जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण तलावाजवळील एका अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर दुखापत झाल्याने ३६ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २५ नाव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अश्विन दीपक चौरसिया वय ३६ रा. मेहरूण तलावजवळ, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अश्विन चौरसिया हे २५ रोजी रात्री बळीराम पेठमधून वडिलांच्या घरून मेहरुण तलाव परिसरातील घरी आले. त्यानंतर सोमवारी २५ नाव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता ते दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले होते. या प्रकरणी मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आली आहे.