विजेच्या धक्क्याने खंब्यावरून पडून जखमी वायरमनचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील भागदरी येथे इलेक्ट्रिक खांब्यावर विजेचे काम करीत असताना झिरो वायरमनला विजेचा जोरदार धक्का बसल्याने व तो खांब्यावरून खाली पडल्याने डोक्याला मार लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ३० जुलै रोजी पहाटे ५.१५ वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. सुनील किसन नरवाडे (वय ४५, रा. टहाकळी ता. जामनेर) असे मयत इसमाचे नाव आहे.

सुनील हे टहाकाळी येथे पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होते. पंचक्रोशीतील गावांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून ते झिरो वायरमन म्हणून काम करीत होते.(केसीएन)त्यावरच त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. शनिवारी ६ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील भागदरी या गावी इलेक्ट्रिकचे काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने ते खांब्यावरून खाली पडल्याने डोक्याला मार लागला. त्यांना ग्रामस्थांनी तातडीने जामनेर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

तेथून जळगाव येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर सोमवारी २९ जुलै रोजी रात्री साडेआठला त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मंगळवारी ३० जुलै रोजी पहाटे ५.१५ वाजता प्राणज्योत मालविली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content