जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडक दिल्याची घटना सोमवारी ८ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडली. यात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सायंकाळी ५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मंगळवारी ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खलील शेख अय्युब मणियार वय-४५ रा. वराडसीम ता. भुसावळ असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, भुसावळ तालुक्यातील वराडसीम गावात खलील शेख अय्युब मणियार हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होतो. भाजीपाला विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. सोमवारी ८ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते दुचाकीने जळगाव शहरातील गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजजवळून दुचाकीने जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाचे त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सायंकाळी ५ वाजता मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.




