धानवड येथील जखमी शेतकऱ्याचा अखेर मृत्यू

images

जळगाव, प्रतिनिधी । खताचे पोते घेऊन जात असताना पडल्याने जखमी झालेल्या शेतकऱ्याचा आज (दि.७) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.

 

उत्तम हरी शिंदे (वय ३८, रा.धानवड, ता.जळगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून शिंदे हे दोन महिन्यांपूर्वी शेतात खताचे पोते वाहुन नेत असताना पडून जखमी झाले होते. त्यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून जळगाव, औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. दरम्यान, शनिवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content