यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातुन बांधण्यात येत असलेल्या शौचालयाचे काम ठेकेदाराकडुन अत्यंत निकृष्ट प्रतिचे होत असुन या कामाची चौकशी करून संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रारी ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की डोंगर कठोरा तालुका यावल येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतुन अनुसूचित जमातीच्या आदीवासी बाधवांच्या वस्तीत शौचालयाचे बांधकाम करण्यात येत असून या कामाच्या ठेकेदाराकडुन शासकीय निवीदाप्रमाणे नमुद करण्यात आलेल्या शौचालयाचे काम हे निकृष्ठ प्रतिचे होत असल्याने जिल्हाधिकारी यांनी सदरच्या कामांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून बांधकाम ठेकेदारास देयके रक्कम अदा करावीत शासन नियमास धाब्यावर ठेवुन शौचालयाची बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचे नांव काळया यादीत टाकावे, अशी मागणी ग्रामस्थ आणी विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना करण्यात आली आहे.