जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एच. जे. थिम महाविद्यालय, जळगावच्या रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी एमआयडीसी, जळगाव येथील Acme Sujan Chemicals या रासायनिक उद्योगाला अभ्यास दौरा केला. या दौऱ्यात विभाग प्रमुख श्री. साजिद मलिक आणि डॉ. मुस्ताकीम बागवान यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध रासायनिक प्रक्रिया, उत्पादन व्यवस्थापन आणि औद्योगिक सुरक्षेचे मूलभूत ज्ञान मिळवले. कंपनीचे व्यवस्थापक श्री. वाघुळदे आणि त्यांच्या तंत्रज्ञ कर्मचारी संघाने विद्यार्थ्यांना उद्योगाच्या कार्यप्रणालीविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रासायनिक अभिक्रियांचे निरीक्षण करून त्याविषयी सखोल समज विकसित केली. उद्योगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण आणि पर्यावरणीय सुरक्षा यासंबंधीही त्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. ही औद्योगिक भेट विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली असून, त्यांना औद्योगिक क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव घेण्याची संधी मिळाली. विभागप्रमुख श्री. साजिद मलिक यांनी सांगितले की, अशा अभ्यास दौऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे औद्योगिक कौशल्य वाढते आणि त्यांना भविष्यातील करिअरसाठी दिशा मिळते. या अभ्यास दौऱ्याच्या यशस्वी आयोजनाकरिता प्राध्यापक डॉ. मुस्तकीम बागवान व डॉ. अखतर शाह यांनी परिश्रम घेतले तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. चांद खान यांचे या अभ्यास दौऱ्याकरिता मार्गदर्शन लाभले