नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्धामुळे जागतिक मंदीचे संकट ओढवले असून या मंदीचा सामना केवळ भारतच नाही तर जगातील इतर देशांनाही करावा लागत आहे, असे नमूद करतानाच या स्थितीतही भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत अधिक मजबूत आहे, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केला.
यावेळी पूढे सीतारमण म्हणाल्या, कॉरपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये चुकीला अपराध मानला जाणार नाही. यातील नियमांवर विचार केला जाईल. 1 ऑक्टोबरपासून टॅक्स विभागशी संबंधीत नोटिस आणि इतर आदेश सेंट्रलाइज्ड कॉप्यूटर सिस्टीममध्ये जारी केले जातील. विना मंजूरी टॅक्स संबंधित नोटिस जारी नाही केले जाणार. कॉप्यूटर जनरेटेड यूनिक डॉक्यूमेंट आयडेंटिफिकेशन नंबरशिवाय कोणतेही कम्युनिकेशन वैध असणार नाही. देशात ‘कॅश फ्लो’ वाढवण्यासाठी ५ लाख कोटी रुपये देण्याची तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी ७० हजार कोटींचे पॅकेज देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी सीतारामन यांनी केली. भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याकव्हे काम वेगाने सुरु आहे. अर्थव्यवस्थेतली सुधारणा हा सरकारचा पहिला अजेंडा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.