जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संविधान अमृतमहोत्सवी वर्ष आणि 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हाच खरा भारतीय स्त्री मुक्ती दिनानिमित्त हिंगोली मध्ये सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि समाज कल्याण विभागाच्या वतीने समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थी विध्यार्थीनी यांच्या सोबत स्त्री मुक्ती दिवस साजरा करत असतांना व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
त्या कार्यक्रमात डॉ. नामदेव तोगरे ( पोस्ट डॉक्टरल फेलो, टेम्पल युनिव्हर्सिटी फिलाडेल्फिया, पेनसिलव्हेनिया, यु.एस.ए ) यांनी “विद्यार्थ्यांसाठी तुमचा करिअर दृष्टिकोन वास्तवाच्या आधारावर आहे का?” या विषयावर समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थी/विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले तसेच सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य सचिव तुषार सूर्यवंशी यांनी “डॉ. आंबेडकरांचा स्त्री मुक्तीचा संघर्ष” या विषयावर विद्यार्थ्यांसोबत संवाद करत संघटनेची भूमिका सांगितली आणि विद्यार्थ्यांना संघटनेत जुळण्यासाठी आव्हान केले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड उपस्थित होते तसेच बार्टी संस्थेचे हिंगोली विभागातील समता धूत आवटे मॅडम, सुरेश पठाडे उपस्थित होते. ऍड. मिलींद पठाडे, संघमित्रा पठाडे, अर्चना पठाडे, भीमराव पठाडे, भारत मोरे, रामचंद्र वाडे, प्रगत पडघन आणि शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात फुले अखंड आणि बाबा साहेबांना वंदन करणारे गीत सादर करून करण्यात आली कार्यक्रमाची प्रास्ताविका जयेश पठाडे आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत पठाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आवटे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत जयेश पठाडे यांनी घेतले तसेच इशांत पठाडे, सुरेश सानप यांनी परिश्रम घेतले.