अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील तांडेपूरा येथील सुपुत्र तथा भारतीय नौदलातील जवान शुभम बिऱ्हाडे यांचे कर्तव्यावर असतांना मुंबई येथील कवायत मैदानात हृयविकाराच्या तीव्र झटक्यान दु:खद निधन झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम बाळू बिऱ्हाडे रा. मु.पो. तांडेपूरा ता. अमळनेर जिल्हा जळगाव हे भारतीय नौसेनेत कार्यरत होते. शुक्रवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी शुभम बिऱ्हाडे हे मुंबई-कुलाबा येथील मुख्यालयातील कवायत मैदानात कवायत करतांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्या दु:खद निधन झाले आहे. शुभम बिऱ्हाडे यांच्या पार्थीव २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता राहत्या घरी आणण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता मुळगावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. या घटनेमुळे बिऱ्हाडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.