Home राष्ट्रीय पिंगलिना परिसरात दहशतवाद्यांना घेरले

पिंगलिना परिसरात दहशतवाद्यांना घेरले

0
31


श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मिरातील पिंगलिना येथे दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी घेरले असून चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जम्मू-काश्मिरमध्ये व्यापक प्रमाणात झाडाझडती सुरू केली आहे. यातून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर काल रात्री पिंगलीना परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. यानंतर त्यांना घेरण्यात आले असून चकमक सुरू झाली आहे. या भागात जैश-ए-महंमद या संघटनेचे तीन अतिरेकी दडून बसल्याची माहिती असून त्यांना भारतीय जवानांनी घेरले आहे. पहाटे तीन वाजेपासून चकमक सुरू असल्याची माहिती आहे. जखमींमध्ये एका मेजरचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळपर्यंत जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound