पॅरीस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय गोल्फर दीक्षा डागर हिचा भीषण अपघात झाला आहे. पॅरिसमध्ये ती एका कार अपघाताची बळी ठरल्याचे बोलले जात आहे. तिच्या शरीरावर जखमेच्या खुणा आहेत, मात्र तिची दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले जात आहे.
या अपघातात दिक्षाच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिक्षा डागर ७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महिला गोल्फ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पॅरिसला पोहोचली होती. सध्याच्या अपडेटनुसार, दीक्षाची प्रकृती स्थिर आहे, मात्र तिची आई गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिक्षाचा अपघात ३० जुलै रोजी संध्याकाळी झाला. हा अपघात झाला तेव्हा दीक्षाच्या कुटुंबातील ४ जण कारमध्ये प्रवास करत होते.