नवीदिल्ली (वृत्तसंस्था) भारताने आज सकाळी अंतराळ क्षेत्रात नवे कीर्तिमान स्थापित करीत अंतराळात एक कमी उंचीवर फिरणारा (लो-ऑर्बीट) उपग्रह अँटी सँटलाईट मिसाईलद्वारे नष्ट करण्यात यश मिळवले आहे. अशी क्षमता असणारा भारत चौथा देश ठरला आहे. या आधी अमेरिका, रशिया व चीन यांच्याकडे ही क्षमता आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आज सकाळी पूर्व नियोजीत लक्ष्य असलेला हा उपग्रह आपल्या उपग्रह भेदी मिसाईलच वापर करून नष्ट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: टी.व्ही.वर राष्ट्राला उद्देशून ही माहिती दिली. हे संपूर्ण मिशन भारताने अत्यंत गोपनीयरित्या पार पाडले. भारतीय अंतराळ क्षेत्राचे हे मोठे यश मानले जात आहे.