उद्या भारत बंद : २५ कोटी कामगार होणार संपात सहभागी

morcha 5

नवी दिल्ली वृत्तसंस्था । ‘जनतेविरोधी’ धोरणांच्या निषेधार्थ देशातील २५ कोटी कामगार उद्या (दि.८) जानेवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होणार असल्याची माहिती दहा केंद्रीय कामगार संघटनांनी सोमवारी दिली.

‘कामगारांच्या कोणत्याही मागण्यांचे आश्वासन देण्यात कामगार मंत्रालय अपयशी ठरले असून, यासाठी २ जानेवारी रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सरकारच्या धोरणांनुसारच कृती करण्याबद्दल सरकारचा दृष्टिकोन आहे,’ असे कामगार संघटनांनी (सीटीयू) संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

फीवाढीची रचना आणि शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात आवाज उठविण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या सुमारे ६० संघटना आणि काही विद्यापीठांचे निवडून आलेले पदाधिकारीही संपात सहभागी होणार आहेत. १७५ हून अधिक शेतकरी आणि कृषी कामगार संघटनांदेखील कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएच, सीआयटीयू, एआययूटीसी, टीयूसीसी, एसईडब्लूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूसी यांच्यासह अनेक कामगार संघटना या संपात सहभागी होतील. अंदाजे २५ कोटी कामगार संपात सहभागी होतील, असा दावा या संघटनांनी सांगितले आहे.

 

Protected Content