अपक्षांसह अन्य राजकीय पक्षांनी वाढवली पाचोऱ्यातील निवडणुकीची रंगत

पाचोरा-नंदकुमार शेलकर । पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूकीसाठी आज माघारीच्या दिवशी २४ पैकी १२ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता अपक्षांसह अन्य राजकीय पक्षांसह असलेले १२ उमेदवार हे निवडणूकीच्या रिंगणात उभे आहे, यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील, ठाकरे गटाकडून वैशालीताई सुर्यवंशी, अपक्ष उमेदवार अमोल शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ यांसह आदींच समावेश आहे.

यांनी घेतली माघार
स्वाभीमानी पक्षाचे उत्तमराव धना महाजन, अफसर अकबर (अपक्ष), नरेंद्रसिंग मुख्यारसिंग सुर्यवंशी (अपक्ष), नितीन नामदेव पाटील (अपक्ष), पुजा अमोल शिंदे (अपक्ष), संजय ओंकार वाघ (अपक्ष), विजय नरहर पाटील (अपक्ष), सचिन अशोक सोमवंशी (अपक्ष), शेख्‍ राजू शेख सलीम (अपक्ष), साबीर खान शब्बीर खान (अपक्ष), संदीप फकीरा जाधव (अपक्ष), आणि हरीभाऊ तुकाराम पाटील (अपक्ष) यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.

यांच्यात होणार लढत
किशोर धनसिंग पाटील (शिवसेना शिंदे), वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), सतीश अर्जुन बिऱ्हाडे (बहुजन समाज पार्टी), अमित मानखा तडवी (वंचित बहुजन आघाडी), प्रताप हरी पाटील (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), मांगो पुंडलिक पगारे (बहुजन महा पार्टी), अमोल पंडितराव शिंदे (अपक्ष), अमोल शांताराम शिंदे (अपक्ष), निळकंठ नरहर पाटील (अपक्ष), मनोहर अण्णा ससाने (अपक्ष), माजी आमदार दिलीप ओंकार वाघ (अपक्ष) आणि वैशाली किरण सूर्यवंशी (अपक्ष) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Protected Content