Home राजकीय सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय

सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय


सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला आहे. विशाल पाटील महायुती आणि महाविकास आघाडीवर भारी पडले आहे. सांगली मतदार संघात महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील तर महायुतीकडून संजयकाका पाटील उभे होते. मात्र य दोघांना विशाल पाटील यांनी पिछाडीवर टाकले आहे.

दरम्यान, सांगलीच्या जागेवरून काँग्रेसमधून विशाल पाटील यांना तिकीट मिळाले नाही. कारण ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली होती. त्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष उभे राहत आपली ताकद दाखवून दिली. विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत.


Protected Content

Play sound