चाळीसगाव, प्रतिनिधी | चाळीसगाव मतदारसंघात विविध उमेदवारांच्या प्रचारास गती मिळात आहे. यात अपक्ष उमेदवार डॉ. विनोद कोतकर यांनी प्रचारात आघाडी घेऊन इतर उमेदवारांसमोर आव्हान उभे केल्याचे बोलले जात आहे.
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद कोतकर यांनी आता आपल्या उमेदवारीतून सर्वच राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यांच्या ग्रामीण भागातील प्रभावी प्रचारामुळे ते लढतीतील प्रमुख उमेदवार म्हणून समोर येत आहेत. मतदारांना आपल्या विकासाचे व्हिजन व तालुक्यासाठी असलेल्या मनातील संकल्पित योजना समजून सांगताना डॉक्टर अत्यंत आत्मविश्वासाने बोलत असल्याने मतदार त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत आहेत. यातून चाळीसगाव तालुक्यातील आखाड्यात डॉ. विनोद कोतकर यांनी एक आव्हान दिल्याने ते विजयाचे प्रमुख दावेदार ठरत असल्याचे मत नागरिकांमध्ये चर्चीले जात आहे.