अपक्ष उमेदवार डॉ. कोतकर यांच्या प्रचारात बच्चे कंपनीची धूम (व्हिडीओ)

do. kotkar

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ. विनोद कोतकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ग्रामीण भागात त्यांना मतदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे चिन्ह फुगा असल्याने प्रचारादरम्यान ते ग्रामीण भागात मुलांना फुगे वाटत असल्याने बच्चे कंपनीची धमाल उडत आहे.

 

तालुक्यातील ऐतिहासिक अशा बहाळ येथील बालाजी रथाचे दर्शन घेऊन डॉक्टरांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे.तालुक्यातील पहिला उमेदवार बालाजीचे दर्शन घेणारा असल्याचे परिसरातून चर्चिले जात होते. प्रचारदौऱ्यात त्यांनी बहाळ न्हावे चितेगाव तांबोळे गणेशपुर येथील नागरिकांना तालुक्याच्या विकासासंदर्भात विविध योजना सांगून भक्कम आश्वासन त्यांनी दिले आहे. एक उच्चशिक्षित सुसंस्कृत डॉक्टर उमेदवार असल्याने अनेक ज्येष्ठ व्यक्तींकडून त्यांचे कौतुक केले जात आहे, तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील आरोग्य सुधारावे, यासाठी डॉक्टरांना आशीर्वाद देत आहेत.

 

 

Protected Content