Home Cities जळगाव अपक्ष उमेदवार अत्तरदे यांचा घारडी व धानोरा येथे प्रचार दौरा

अपक्ष उमेदवार अत्तरदे यांचा घारडी व धानोरा येथे प्रचार दौरा

0
60

WhatsApp Image 2019 10 16 at 3.18.18 PM

धानोरा, प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांनी आज १६ ऑक्टोबर रोजी घारडी व धानोरा येथे प्रचार दौरा काढला असता नागरिकांनी स्वयस्फूर्तीने सहभाग घेत आहेत.

घारडी व धानोरा गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. यावेळी गावातील नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी कृ.उ.बा.स. सभापति लकी आण्णा उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील, गावातिल सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रमुख पदाधिकारी, ममुराबाद-आसोदा गटातील शक्ति प्रमुख भूषण बावीस्कर, समाधान कोळी, किरण पाटील उपस्थित होते. यावेळी बूथ प्रमुख विनोद पाटील, सागर कोळी, अशोक चव्हाण, बापू कोळी, मोरेश्वर सरोदे, विजय सपकाळे, मनेश सपकाळे, राजेंद्र पाटील, किरण पाटील, गोपाल मोरे, सुधीर पाटील, रविंद्र पाटील तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound